रामलल्लाची मूर्ती आणि प्रभावळीवरील चिन्हांचा अर्थ-अत्यंत खास आहे रामलल्लाची मूर्ती, अशा प्रकारे दर्शवल्या गेले आहे भगवान विष्णूंचे 10 रूप

रामलल्लाच्या मूर्तीबद्दल –
●रामलल्लाची मूर्ती 4.24 फूट उंच आहे.
●मूर्ती 3 फूट रुंद आहे.
●या मूर्तीचे वजन सुमारे 200 किलो आहे.

रामलल्लाची ही मूर्ती कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. रामलल्लाची मूर्ती एकाच दगडापासून बनवली आहे, म्हणजेच मूर्तीच्या दगडात दुसरा दगड जोडलेला नाही

●रामललांच्या मूर्तीमागची प्रभावळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. रामलल्लाच्या मूर्तीच्या दोन्ही बााजूंना सुरुवातीला हनुमंत आणि गरुडाच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत, तर वर मध्यभागी सूर्यदेवतेची मूर्ती आहे. तर रामलल्लाच्या प्रभावळीर मध्ये दोन्ही बाजूला श्रीहरी विष्णूंच्या दशावतारातील अवरात कोरण्यात आले आहेत.

● रामलल्लाच्या प्रभावळीवरील प्रत्येक चिन्हाला आहे विशेष महत्त्व
रामललाच्या मूर्तीभोवती बनवलेल्या कलाकृतीत अनेक खास प्रतिमा आहेत. या चिन्हांचे नेमके काय महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया.

सूर्यदेव – सूर्यदेव हे रामाच्या वंशाचे प्रतीक आहे. यासोबतच सूर्याला शिस्तीचे प्रतीक मानले जाते. प्रभू रामाचे चरित्र सूर्यदेवतेप्रमाणे स्थिर आहे.
शेषनाग – शेषनाग हे भगवान विष्णूच्या शय्येचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे.
ओम – ओम ही या विश्वातील पहिले अक्षर आहे आणि तो सूर्यचा आवाज देखील मानला जातो. ओम हे सनातन धर्माच्या परंपरेचे प्रतीक आहे.
गदा – गदा हे शक्तीचे प्रतीक मानले जाते. रामाचा संकल्प त्याच्या गदेसारखा मजबूत आहे. त्यामुळेच रामाच्या मूर्तीमध्ये गदालाही स्थान देण्यात आले आहे.
स्वस्तिक – स्वस्तिक हे आपल्या संस्कृतीचे आणि वैदिक परंपरेचे प्रमुख प्रतीक आहे. प्रभू राम हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत.
आभा – भगवान रामाच्या चेहऱ्यामागे निर्माण झालेली आभा संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे.
धनुष्य – हे केवळ शस्त्र नाही, धनुष्य हे मुळात भगवान रामाच्या शिक्षणाचे आणि प्रयत्नांचे प्रतीक आहे.

●हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार ‘दशावतार’ स्वरुपात प्रसिध्द आहेत.रामलल्लाच्या मूर्तीवर अशा प्रकारे दर्शवल्या गेले आहे भगवान विष्णूंचे दहा रूप


सत्य युगातील विष्णू म्हणजेच
१ – मत्स्य अवतार– माश्याच्या रूपातील अवतार
– कूर्म अवतार – कासवाच्या रूपातील अवतार
– वराह अवतार – डुकराच्या रूपातील अवतार
– नृसिंह अवतार – अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे मानवाचे
त्रेता युगातील विष्णू म्हणजेच
– वामन अवतार – बटूक ब्राह्मण रूपातील अवतार
– परशुराम अवतार- ब्राह्मण योद्धा रूपातील अवतार
– श्रीराम अवतार – मर्यादा पुरुषोत्तम रूपातील अवतार
द्वापर युगातील विष्णू म्हणजेच
– श्रीकृष्ण अवतार- १६ कला अवगत असलेला पूर्ण रूपातील अवतार
– बुद्ध अवतार- क्षमा, शील, आणि शांती रूपातील अवतार कलियुगातील विष्णू म्हणजेच १० – कल्कि अवतार – ( हा अवतार कलियुगाच्या शेवटी होणार आहे असे मानले गेले आहे ) सृष्टीच्या संहारक रुपात

“श्रीराम ज्यांचे नाव आहे
अयोध्या त्यांचे धाम आहे
एक वचनी, एक बाणी
मर्यादा पुरुषोत्तम
अशा रघुनंदनाला माझा प्रणाम..”

Leave a Comment